logo

टिचलेला पोल अखेर पडलाच. महावितरण चा भोंगळा कारभार.

टिचलेला पोल अखेर पडलाच.
महावितरण चा भोंगळा कारभार.
परतुर प्रतिनिधी :-
भाऊसाहेब पाटील मुके
तालुक्यातील मौजे श्रीधर जवळा येथे दि. 23 रोजी सायंकाळी सहा साडे सहा च्या दरम्यान अचानक जोराचे वादळी वारे सुरु झाले. यामुळे गल्लीतील टिचलेला विजेचा पोल / खंबा तुटून पडला. पोल तुटल्याने अनेकांच्या घरावर तारा पडल्या तेव्हा विद्युत प्रवाह सुरु होता. परंतु नशीब बलवत्तर म्हणून कोणत्याही घरावर विद्युत प्रवाह उतराला नाही.नसता अघटीत घटना घडली असती.
सद्या वादळी वाऱ्याचे दिवस आहेत. म्हणून गेली महिनाभरापासून महावितरण ला सदरील गल्लीतील अनेकांनी वेळोवेळी कल्पना देऊनही सदरील टीचलेला पोल बदलला नाही.यामुळे महावितरण चा किती भोंगला कारभार सुरु आहे हे या घटनेवरून लक्षात येते. तेव्हा आता तरी महावितरण ने चांगल्या प्रकारचा पोल बसवून द्यावा व भविष्यात परत अशी घटना घडल्यास घरांवर विद्युत प्रवाह उतरणार नाही.त्यामुळे गल्लीतील तारांना प्लास्टिक चे पाईप बसवावेत. अशी मागणी सचिन खरात, शाम राजबिंडे, इंदरराव खरात, संतोष काटे, ज्ञानदेव बागल, परमेश्वर खरात, सुरेश काटे, भागवत राजबिंडे आदींनी केली आहे.
चौकट :- काल आमच्या प्रतिनिधी ने हातडी, दैठाणा, सिंगोना सह तीन चार गावांना भेटी दिल्या असता. अनेक ठिकाणी शेतातील पोल वाकलेले दिसून आले व तारा ही लोंबकळलेल्या दिसून आल्या. तेव्हा महावितरण ने वादळी वाऱ्याच्या या दिवसात त्वरित सदरील पोल बदलावेत. व भविष्यातील अघटीत घटना टाळाव्यात.

0
960 views